मुंबई

पोषण ट्रॅकरवर विशेष मार्गदर्शन

CD

पोषण ट्रॅकरवर विशेष मार्गदर्शन
महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक
अलिबाग, ता. ६ (वार्ताहर) : महिला व बालविकास विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांसाठी पोषण ट्रॅकर प्रणालीवर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी (ता. ४) कुरूळ येथील सुरुची हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाचा आढावा घेणारी बैठकही घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या नवनिर्वाचित सभापती रसिका केणी होत्या. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रशिक्षणात जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. अंगणवाडी स्तरावर बालकांचे पोषण, महिलांचे आरोग्य आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर त्यांनी विशेष भर दिला.
सभापती रसिका केणी यांनी सांगितले, की जिल्ह्यातील प्रत्येक बालक सुदृढ आणि कुपोषणमुक्त व्हावे तसेच प्रत्येक महिलेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, हा आपला प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाला समितीच्या सदस्य उर्वशी वाडकर, मनाली काळीजकर, पंचायत समिती सभापती रंजना वासकर, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, जि. प. सदस्य वर्षा दोरे, जि. प. सदस्य सुवर्णा ठाकरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी निर्मला कुचिक, विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
चौकट
डिजिटल प्रणालीमुळे अचूक नोंदी
पोषण ट्रॅकर प्रणालीमुळे बालकांच्या आरोग्याची व पोषण स्थितीची अचूक व तत्काळ नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कुपोषण ओळखणे, उपाययोजना राबवणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी अधिक गतिमान होणार असल्याचे या प्रशिक्षणातून स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT