मुंबई

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा

CD

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : वाशी येथील एका आलिशान बांधकाम प्रकल्पात सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या २७व्या मजल्यावर काम करत असताना सुरक्षेचे कोणतेही साधन न वापरल्यामुळे एका २० वर्षीय कामगाराचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वाशी पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या ‘अरिहंत ऑरा’चे संचालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.

वाशी सेक्टर नऊ येथील ‘अरिहंत अद्विका’ या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पीओपी बसवण्याचे काम कामरान इब्राहिम खान (वय २०) हा २८ एप्रिलला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करत होता. तो २७व्या मजल्यावर लोखंडी शिडीवर उभा राहून मशीनच्या साह्याने छिद्रे पाडत होता. याच वेळी अचानक त्याचा तोल गेल्याने तो थेट खाली जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत कामरान गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वाशी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून या घटनेचा तपास केला असता, इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षेची खबरदारी घेणे गरजेचे असताना, कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. या निष्काळजीमुळेच कामरानला जीव गमवावा लागल्याचे आढळून आले. त्यानुसार वाशी पोलिसांनी या प्रकरणात स्वतः फिर्यादी होऊन संबंधित कंपनीचे संचालक आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात ६ लाखांचे 'MD' ड्रग्ज जप्त

SCROLL FOR NEXT