मुंबई

पनवेल स्थानकात अतिक्रमण

CD

पनवेल स्थानकात अतिक्रमण
फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना त्रास; रेल्वे प्रशासनाविरोधात संताप
खारघर, ता. ६ (बातमीदार) : खारघर रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे प्रवाशांचे हाल होत असून, रेल्वे पोलिसांच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील मोकळ्या जागेत विविध फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय थाटल्याने संपूर्ण परिसर गजबजलेला दिसतो.
रेडिमेड कपडे, मोबाईल ॲक्सेसरीज, खाद्यपदार्थ, भाजीपाला आणि इतर वस्तूंच्या विक्रीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने उभी राहिल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांना मोठ्या गर्दीतून वाट काढावी लागत असून, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट बनते. प्रवेशमार्गावरच अतिक्रमण झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून, कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे.
स्थानिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासन आणि रेल्वे पोलिस कोणतीही ठोस कारवाई करीत नसून केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या स्थानक परिसरात अशा प्रकारे अनधिकृत व्यवसाय वाढत असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पनवेल रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
सुरक्षेचा वाढता धोका
अतिक्रमणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मार्ग मोकळा ठेवणे कठीण होत आहे. आग, अपघात किंवा इतर आपत्तीच्या वेळी बचावकार्यात अडथळा येऊ शकतो, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
बॉक्स
नियमित कारवाईची गरज
फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवणे आणि नियमित अतिक्रमणविरोधी मोहीम राबवणे आवश्यक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून स्थानक परिसर मोकळा व सुरक्षित ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट :
खारघर रेल्वे स्थानक आवारात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यावर नियमितपणे कारवाई केली जाते. तसेच रेल्वे पोलिस विभागाकडून कारवाई केली जाते.
- एन. एच. शेख, पोलिस निरीक्षक, पनवेल रेल्वे पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT