मुंबई

दादर येथे बाल कीर्तनकार महोत्सव

CD

दादर येथे आजपासून बालकीर्तनकार महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अखिल भारतीय कीर्तन संस्थेतर्फे गुरुवार, ७ ते शुक्रवार १५ मे २०२६ या कालावधीत दादर येथे बालकीर्तनकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.‌
मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील तसेच गोवा राज्यातील १६ बालकीर्तनकार या महोत्सवात कीर्तन सेवा सादर करणार आहेत. हा कार्यक्रम अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या डी. एल. वैद्य मार्गावरील वास्तूत होणार आहे.
बालकीर्तनकार महोत्सवाची सुरुवात ७ मे रोजी समीक्षा कुर्टीकर (गोवा), ईश्वरी कांदोळकर (गोवा) यांच्या कीर्तनाने होणार आहे, तर १५ मे रोजी सर्वेशा चाकूरकर (पुणे), रघुराज निमकर (पुणे) यांच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. कीर्तन महोत्सवात कौमुदी साल्पेकर (नागपूर), आर्या परांजपे (पुणे), अवनी परांजपे (पुणे), आर्जवी वैद्य (नेरळ), स्वरा जगदाळे (मुंबई), मुद्रा सावंत (मुंबई), देवव्रत देशपांडे (नागपूर), श्रुती सावंत (मुंबई), स्मरण देशपांडे (मुंबई), आराध्या लक्रस (अकोला), स्वरांगी व्हरसाळे (अकोला), दीपा कडू (अकोला) हे बालकीर्तनकार सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

Mumbai News: ऑफर पडली महागात! ग्राहकांच्या गर्दीने शोरूमला सेल रद्द करण्याची वेळ; इन्फिनिटी मॉलमध्ये गोंधळ

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

Latest Marathi News Live Update : ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदे शनी चरणी होणार नतमस्तक...

Lorcan Tucker: भारताविरुद्ध आता मालिकाच जिंकलो, तर...' आयर्लंडचा कर्णधार ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT