मुंबई

एमएमआरला हाय-स्पीड जोडणी

CD

एमएमआरला हाय-स्पीड जोडणी
ऐरोली-काटई नाका प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण; ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला गती मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : एमएमआरडीएकडून राबवल्या जात असलेल्या ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरमुळे ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला गती मिळणार आहे. हा कॉरिडॉर तीन टप्प्यांत विकसित केला जात असून, टप्पा दोनचे काम पूर्ण झाले आहे, तर टप्पा एकचे काम अंतिम टप्प्यात असून, टप्पा तीनचे काम प्रगतिपथावर आहे.
हाय-स्पीड कॉरिडॉर म्हणून संकल्पित या प्रकल्पामुळे ऐरोली, मुंब्रा आणि काटई नाका यांना अखंड रस्त्याने जोडणी मिळणार असून, प्रवासाचे अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूरदरम्यान जलद व कार्यक्षम प्रवास शक्य होईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
एमएमआरमधील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवणाऱ्या ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर प्रकल्पाचा टप्पा दोन पूर्ण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करतानाच हा कॉरिडॉर केवळ रस्ते प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची धोरणात्मक गुंतवणूक आहे. या प्रकल्पातील पाहिले दोन्ही टप्पे वाहतुकीसाठी यावर्षीच सुरू करण्यात येतील. या प्रकल्पामुळे प्रमुख विकास केंद्रांदरम्यान वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होऊन आर्थिक उपक्रमांना चालना मिळेल, लॉजिस्टिक्स सुधारेल आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हाय-स्पीड ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर ठाणे आणि नवी मुंबईसाठी मोठा कनेक्टिव्हिटी बूस्टर ठरणार आहे. विशेषतः बोगद्यामुळे दोन्ही भागांदरम्यान अधिक जलद व अखंड प्रवास शक्य होईल, असे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार असून, असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

असा आहे प्रकल्प
- टप्पा एक, दोन आणि तीनची एकूण लांबी सुमारे १२.७१ किमी
- संरचना - ३+३ लेन
- बोगदा - दुहेरी बोगदा (तिहेरी ३ वाहतूक लेन + १ आपत्कालीन मार्ग)
- बोगदा खोदण्यासाठी एनएटीएम तंत्रज्ञानाचा वापर (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड – ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग)

- टप्पा एक - बोगदा आणि उन्नत मार्ग (ठाणे-बेलापूर रोड ते एनएच-०४)
हा टप्पा कॉरिडॉरचा मुख्य आधार असून, ऐरोली आणि राष्ट्रीय महामार्ग-४ (NH-०४) यांना मुंब्रा येथे थेट जोडतो.
एकूण लांबी : ३.४३ किमी

- दुहेरी बोगदा लांबी :१.६९ किमी (प्रत्येक ट्यूबमध्ये ३ वाहतूक लेन + १ रिफ्यूज लेन)
- रुंदी : १७.५० मीटर (प्रत्येक ट्यूब)
- नागरी कामे : ९२ टक्के पूर्ण

- उन्नत मार्ग लांबी : ०.९४ किमी
संरचना : ३+३ लेन
- बोगद्याबरोबरच कार्यान्वित केला जाईल
- प्रकाश, वायुवीजन आणि अग्निशमन यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींची बसवणी अंतिम टप्प्यात असून, या नागरी कामांनंतर लवकरच पूर्ण होईल.
- या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्गला (एलएच-०४) अखंड आणि निर्बाध जोड मिळेल.

- टप्पा २ : उन्नत मार्ग (ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड)
- लांबी : २.५७ किमी
- मुख्य व्हायाडक्ट : ३+३ लेन
- रॅम्प्स : ऐरोली-मुलुंड रोडवर ३-लेन अप व डाऊन रॅम्प्स
- १०० टक्के काम पूर्ण
हा टप्पा टप्पा १ सोबतच कार्यान्वित केला जाणार आहे.
- मुलुंड-ऐरोली ब्रिज आणि मुंब्रा यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होईल.

- टप्पा ३ : राष्ट्रीय महामार्ग (एनएच-०४) ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड कॉरिडॉर)
- लांबी : सुमारे ६.७१ किमी (पूर्णपणे उन्नत मार्ग)
- मुख्य व्हायाडक्ट : ३+३ लेन
- सेवा रस्ते : दोन्ही बाजूंना २+२ लेन
- सुमारे १० टक्के काम पूर्ण
- ऑक्टोबर २०२८ पर्यंत हा अंतिम टप्पा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-०४) पासून काटई नाक्‍यापर्यंत विस्तार करत संपूर्ण प्रादेशिक संपर्क साखळी पूर्ण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT