अलिबाग-रेवस मार्गावरील खड्ड्यांनी जीव धोक्यात
दुरुस्तीची मागणी; प्रशासनाला इशारा
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : अलिबाग ते रेवस धक्का या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस खालावत असून, रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वाहनचालकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत असून, दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर (उर्फ छोटमशेठ) यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यांनी याआधीही या मार्गावर घडलेल्या अपघातांचा उल्लेख केला आहे. चोंढी येथे एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर धोकवडे परिसरातही काही महिन्यांपूर्वी गंभीर अपघात घडला होता.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान वाढले असून, रात्रीच्या वेळी धोका अधिक तीव्र होतो. पावसाळा जवळ आल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
चौकट
पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती अत्यावश्यक
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे अधिक मोठे आणि धोकादायक बनतात. साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत, परिणामी अपघातांची शक्यता अनेकपटीने वाढते. अलिबाग-रेवस मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. प्रशासनाने विलंब न करता ठोस उपाययोजना केल्यास संभाव्य जीवितहानी टाळता येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.