मुंबई

सभागृह नेतेपदी रवी व्यास यांची निवड

CD

सभागृह नेतेपदी रवी व्यास यांची निवड

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे ॲड. रवी व्यास यांची निवड करण्यात आली आहे. तर विरोधी पक्षनेतेपदी सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर डिंपल मेहता यांनी दोघांच्या नावाची घोषणा केली.
महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाकडून सभागृह नेतेपदी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता होती. पक्षाने रवी व्यास यांना हे पद दिले आहे. व्यास यांनी याआधी महापालिकेचे स्थायी समिती सभापतिपद सांभाळले आहे. सध्या मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छित होते; मात्र नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली गेली होती. त्यामुळे सभागृह नेतेपद देऊन समतोल साधला गेल्याचे बोलले जात आहे.
-----------------------
तरुण नगरसेविकेवर जबाबदारी
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कॉँग्रेसच्या प्रथमच निवडून आलेल्या तरुण नगरसेविका आफरीन हुसेन यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांच्या कन्या आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambanli Ghat: आंबेनळी घाटात अपघातांना ब्रेक! अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंतींसह आधुनिक सुरक्षायंत्रणा उभारण्यास सुरुवात, बांधकाममंत्र्यांची माहीती

IPO: अवघ्या 2 दिवसांत 44 पट सबस्क्राइब! ज्वेलरी कंपनीच्या IPO ची बाजारात धूम; GMP तब्बल 36%; मोठ्या कमाईची संधी?

सोलापूर शहरातील ‘या’ ५ पोलिस ठाण्यास मिळणार नवे प्रभारी! तिघांना पदोन्नती, दोघांचा कार्यकाळ पूर्ण; ‘या’ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा, कोणाला मिळणार संधी

Maharashtra Rain Update : पावसाची दमदार सलामी; मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

Water Scarcity : पुरंदर-बारामतीची चिंता वाढली; ‘नाझरे’ची भिस्त मृत साठ्यावर

SCROLL FOR NEXT