मुंबई

पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

CD

पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
खारघरमध्ये वाहतूक कोंडी, तातडीने कारवाई करण्याची मागणी
खारघर, ता. ७ (बातमीदार) : खारघरमधील उत्सव चौक ते सेंट्रल पार्क या प्रमुख मार्गावर फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला टेम्पो उभे करून आंबे, काकडी आणि फळविक्री केली जात असून, खरेदीदार हे रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या अतिक्रमणांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खारघरकरांकडून होत आहे.
उत्सव चौक ते टाटा हॉस्पिटल मार्गे तळोजाकडे जाणारा हा मुख्य रस्ता सेक्टर १२ ते ४० परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. याच मार्गावरून तळोजा, कल्याण आणि मुंब्रा दिशेकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्याचबरोबर गोल्फ कोर्समध्ये येणारे खेळाडू, इस्कॉन मंदिरात येणारे भाविक तसेच सेंट्रल पार्कमध्ये नवी मुंबई, पनवेल आणि कामोठे परिसरातून येणाऱ्या पर्यटकांमुळे दिवसभर या परिसरात वर्दळ असते.
अशा परिस्थितीत काही टेम्पोचालकांनी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे आंबेविक्रेते, फळ, भाजीपाला आणि आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पालिका प्रशासनाची जबाबदारी शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्याची असताना, या मुख्य मार्गावर उघडपणे अतिक्रमण होत असूनही पालिका आणि वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागात विचारणा केली असता, रस्त्यावरील वाहनावर नियमितपणे कारवाई केली जाते. मात्र, पदपथावरील अतिक्रमण हटविणे हे पालिकेचे काम असल्याचे सांगितले. यासंदर्भात खारघर कार्यालयाचे प्रभाग अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्याशी अनेक वेळा संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

टेम्पोचालकांची दादागिरी.
उत्सव चौक ते टाटा हॉस्पिटल, सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या मार्गांवर काही टेम्पोचालकांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटला आहे. फळविक्रेत्यांकडे विचारणा केल्यास हा व्यवसाय परिसरातील काही स्थानिकांचा असून, आम्ही केवळ कामगार आहोत, असे सांगितले जाते. त्यामुळे पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी या व्यवसायामागील संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

चौकट
अपघातात वाढ
मागील वर्षी उत्सव चौक ते सेंट्रल पार्क मार्गावरील पदपथावरून फळ खरेदी करून रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली होती, तर नुकतेच एका २८ वर्षीय तरुणांचा रस्त्यावर वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतरही पालिकेचा अतिक्रमण विभाग आणि खारघर वाहतूक शाखा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT