वीज-पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा
विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील वारंवार होणारी वीज खंडितता आणि त्यामुळे विस्कळित होणारा पाणीपुरवठा या गंभीर प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. मनसे विक्रमगड तालुका अध्यक्ष योगेश शंकर पाटील यांनी विक्रमगड उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत नागरिकांच्या समस्या मांडल्या असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास पुढील पंधरवड्यात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मनसेकडून देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींचा उल्लेख करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात सांगण्यात आले की, वीज दुरुस्तीच्या नावाखाली अनेकदा तासनतास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, याबाबत नागरिकांना पूर्वसूचना दिली जात नाही. परिणामी पाणीपुरवठादेखील पूर्णपणे ठप्प होतो आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. नागरिकांच्या भावना व्यक्त करत निवेदनात म्हटले आहे.
तसेच टँकरने पाणी द्या. उन्हात वीज-पाणी दोन्ही बंद म्हणजे जगायचे कसे? सध्या मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे विक्रमगड तालुक्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचत आहे. अशा परिस्थितीत वीज आणि पाणी दोन्ही सेवा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.