मुंबई

माणगाव मंडळात ‘महाराजस्व समाधान शिबिर’

CD

माणगाव मंडळात ‘महाराजस्व समाधान शिबिर’
१८७ लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप
माणगाव, ता. ८ (वार्ताहर) : माणगाव मंडळात शुक्रवारी (ता. ८) ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ माणगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आले. शिबिरात विविध विभागांचे स्टॉल उभारून नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच आवश्यक दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
या शिबिराला तहसीलदार विपिन लोकरे, नायब तहसीलदार अरविंद घेमुड, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर यादव, सीडीपीओ बिर्जे मॅडम, मुख्याधिकारी संतोष माळी, भूमी अभिलेख उपाधीक्षक गणेश सोनार, पुरवठा शाखेचे नायब तहसीलदार राहुल शितोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली पुरी, आरोग्य अधिकारी डॉ. सुशील भातमकर, मंडळ अधिकारी अर्जुन जमखंडी तसेच ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एकूण १८७ लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये उत्पन्नाचे २५, रेशन कार्ड १०, संजय गांधी निराधार योजनेचे १७, जन्म-मृत्यू नोंद ३, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना १, वारस नोंद ७, जातीचे दाखले ९०, रहिवासी प्रमाणपत्र १, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ३, ॲग्री स्टॅक प्रमाणपत्र २५ आणि घरकुल योजनेचे ६ दाखले यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

SCROLL FOR NEXT