मुंबई

अनधिकृत शाळांना प्रशासनाचा दणका

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, शिक्षण विभागाने ५८ बेकायदा शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ५८ शाळांपैकी ३७ शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सर्वेक्षणात मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळा आवश्यक मान्यता न घेता सुरू असल्याचे उघड झाले. त्यानुसार मान्यता न घेतलेल्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या दोन, हिंदी माध्यमाच्या तीन आणि इंग्रजी माध्यमाच्या तब्बल ५३ शाळांचा समावेश आहे. या शाळांमधून आयसीएसई, सीबीएसई, आयबी तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या नावाखाली प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक ४३ अनधिकृत शाळा दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आढळून आल्या आहेत. त्याखालोखाल कळवा परिसरात नऊ शाळा असून, मानपाडा-माजिवडा आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी दोन शाळा आहेत. तसेच मुंब्रा आणि वर्तकनगर येथे प्रत्येकी एका अनधिकृत शाळेची नोंद झाली आहे.

आरटीई कायद्याअंतर्गत संबंधित शाळांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेण्यापूर्वी शाळेची अधिकृत मान्यता, युडायस क्रमांक, प्रथम मान्यता प्रमाणपत्र, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश घेतल्यास पालक जबाबदार!
शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास पालकांनी विष्णूनगर, नौपाडा येथील ठाणे महापालिका शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने सांगितले. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी शिक्षण विभागाची राहणार नसल्याचे उपायुक्त मिताली संचेती यांनी स्पष्ट केले.

आकडेवारीमध्ये घट
मागील शैक्षणिक वर्षात ठाणे महापालिका हद्दीत ८१ अनधिकृत शाळा कार्यरत होत्या. त्या वेळी जवळपास १९ हजार विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत होते. यंदा अनधिकृत शाळांची संख्या ५८ पर्यंत खाली आली असून, त्यातील ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT