मुंबई

नवी मुंबईतील कलिंगड बाजाराला दिलासा

CD

जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया परिवारातील चार जणांच्या मृत्यूचे कारण कलिंगड नसून उंदराचे औषध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यामुळे झाल्याच्या बातम्या विविध प्रसारमाध्यमांतून झपाट्याने प्रसारित झाल्या होत्या. या बातम्यांचा थेट परिणाम मुंबईतील कलिंगड बाजारावर झाला होता. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी कलिंगड खरेदीत मोठी घट झाली आणि बाजारातील मागणी अचानक कमी झाली. विक्री ठप्प झाल्याने कलिंगडाचे भाव प्रतिकिलो तब्बल १० ते १५ रुपयांनी घसरले. त्यामुळे व्यापारी आणि कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

परिणामी बाजारात मोठ्या प्रमाणावर माल पडून राहिला होता. विक्रीअभावी अनेकांना माल कमी भावात विकावा लागला, तर काही ठिकाणी माल खराब होण्याची वेळ आली. उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कलिंगड बाजाराला या घटनेचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे इतर रसाळ फळांच्या भावात प्रचंड वाढ झाली होती. मात्र, आता काहीअंशी व्यापारात वृद्धी होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
मात्र, आता नव्या माहितीनुसार संबंधित मृत्यूचे कारण उंदराचे औषध असल्याचे समोर आल्यानंतर ग्राहकांमधील संभ्रम कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा सकारात्मक वातावरण तयार होत असून, येत्या काही दिवसांत कलिंगड विक्री पूर्वपदावर येईल, तसेच भावातही स्थिरता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. व्यापाऱ्यांनी नागरिकांना खात्रीशीर माहितीलाच महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे. तसेच कलिंगड हे उन्हाळ्यातील सुरक्षित आणि आरोग्यदायी फळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.


आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की, संबंधित घटना कलिंगड खाल्ल्याने झाली नसावी. मात्र, तरीदेखील जोपर्यंत घटनेचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत कोणताही अंदाज बांधणे योग्य नसल्याने आम्हीदेखील काळजीत होतो. आता लवकरच बाजार सुरळीत होईल, अशी आशा आहे.
- विश्वजीत सिंग, कलिंगड व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

IPL Playoff Race: राजस्थान की गुजरात? आज जो जिंकेल तो थेट अव्वल दोनमध्ये झेप घेणार; पाहा प्लेऑफचं नवं समीकरण

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

SCROLL FOR NEXT