मुंबई

लोकरंगनायक’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

CD

मंगळवारी ‘लोकरंगनायक’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, ता. ८ : ‘ग्रंथाली’ प्रकाशित लोकसाहित्य आणि लोककला यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ प्रकाश खांडगे यांच्या ‘लोकरंगनायक’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता. १२) पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटरमध्ये दुपारी साडेचार वाजता होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषदेचे माजी सदस्य, संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, नाटककार-लेखक अभिराम भडकमकर, तमाशासम्राट पद्मश्री रघुवीर खेडकर आणि लावणीसम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर उपस्थित राहणार आहेत.
‘लोकरंगनायक’ या पुस्तकात गोंधळमहर्षी राजाराम भाऊ कदम, पद्मश्री शाहीर साबळे, ह.भ.प. रामदासबाबा मनसुख, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर विठ्ठल उमप, तमाशासम्राट दत्तोबा तांबे, शिरोलीकर शाहीर बापूराव विभूते, वगसम्राट दादू इंदुरीकर, तमाशासम्राट रघुवीर खेडकर, हरिभक्तपरायण डॉ. रामचंद्र देखणे, पद्मश्री परशुराम गंगावणे, लोककलांचे अभ्यासक नाटककार-गीतकार अशोक परांजपे, तमाशातील विनोदाची जोडगोळी काळू-बाळू या गाजलेल्या लोककलावंतांचे चरित्र आणि प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्याबरोबरचे त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्यात आले आहे, असे कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

खळबळजनक : वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटपटूच्या घरी सापडला एअरलाइन्सच्या SEO चा मृतदेह, क्रीडाविश्व हादरलं; आत्महत्या की हत्या?

Ashtavinayak Temples : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील अष्टविनायक मंदिरे महिनाभर राहणार बंद

Beed Land Scam : बदलीनंतरही आरोपींसोबत 'लोकेशन' झालं ट्रेस! बीडचा भूसंपादन घोटाळा सनदी अधिकारी अविनाश पाठकांना कसा नडला? वाचा इनसाईड स्टोरी

Latest Marathi News Live Update : शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT