मुंबई

अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

CD

अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात महसूल मंत्र्यांकडे तक्रार

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : मोर्बे येथील सर्व्हे क्रमांक ६८/१अ जमीन प्रकरणात नियमबाह्य निर्णय घेतल्याचा आरोप करत डॉ. जयंत भोईर यांनी पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याविरोधात राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. न्यायालयीन आदेश, महसूल मंत्र्यांचे निर्देश आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वार्थापोटी चुकीचा निर्णय देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
याप्रकरणी महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नियमानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. भोईर यांच्या माहितीनुसार, संबंधित जमीन २०१२ मध्ये रियलसेल्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने खरेदी केली होती; मात्र आवश्यक परवानगी न घेतल्यामुळे त्या व्यवहाराची नोंद ७/१२ उताऱ्यावर झाली नव्हती. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी २०१५ मध्ये अधिसूचना मंजूर केली होती.
यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी फेरफार मंजूर करून जमीन खरेदीदाराच्या नावावर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, डॉ. भोईर यांनी जमीन व्यवहारासंदर्भात न्यायालयात दावा दाखल केला असता न्यायालयाने संबंधित जमिनीवर मनाई हुकूम जारी केला होता. तरीदेखील तहसीलदारांनी या आदेशाची नोंद घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात फेरफार मंजूर झाल्याचे नमूद असूनही त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.


न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष
तक्रारीतील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे न्यायालयाने दिलेल्या मनाई हुकूमाची नोंद ७/१२ उताऱ्यावर करण्याचा अर्ज करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. न्यायालयीन आदेश असताना त्याकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. भोईर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT