मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल ९२.०८ टक्के

CD

पालिकेच्या शाळांचा निकाल ९२.०८ टक्के
६६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

मुंबई, ता. ८ ः यंदा दहावीच्या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून एकूण १५,९०३ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४,६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ९० टक्क्यांवर अधिक गुण मिळविलेले ६६ विद्यार्थी आहेत.

सीताराम मिल कंपाउंड एमपीएस महापालिका माध्यमिक शाळेमधील स्वयम शेखर गोरेगावकर या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून महापालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला, तर द्वितीय क्रमांक डी. एन. नगर एमपीएस माध्यमिक शाळेच्या अशिया जाकीर सय्यदला मिळाला. तिने ९६.२० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिसरा क्रमांक प्रभादेवी एमपीएस माध्यमिक शाळेच्या दीपक अरुण तिवारीने (९५.८० टक्के) मिळवला. गोखले रोड एमपीएस माध्यमिक शाळेच्या जिनल हरेश सुमेसरा ९५.८० टक्के मिळवून चतुर्थ क्रमांक मिळवला. गुंदवली एमपीएस माध्यमिक शाळेमधील प्रिन्स अखिलेख मौर्या (९५.२०) पाचवा आला. नेहरूनगर एमपीएस माध्यमिक शाळेतील किशन श्रीनंद प्रजापती (९४.४०) व सहकारनगर एमपीएस माध्यमिक शाळेतील शुभम चंद्रप्रकाश चौधरी या विद्यार्थ्यांना ९४.४० टक्के गुण मिळाले आहेत.
...
मिशन मेरिटचा सराव
मुंबई महापालिकेच्या निकालवृद्धीकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात. महापालिका शिक्षण विभागामार्फत योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येते. पालिकेने स्वतःची अशी ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिकेची निर्मिती केली, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण प्राप्त होण्यास मदत होते.
...
विविध प्रयत्न
विद्यार्थ्यांना गणित व्यवसाय पुस्तिकाही देण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता बोर्डाच्या धर्तीवर शालेय स्तरावर दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येतात. सर्व अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शन करण्यात येते. दरमहा दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात येतात. निकालवृद्धीबाबत शिक्षकांसाठी, विद्यार्थांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
...
मागील निकाल
वर्षे निकाल
२०२२ ९७.१० टक्के
२०२३ ८४.७७ टक्के
२०२४ ९१.५६ टक्के
२०२५ ९२.९२ टक्के
२०२६ ९२.०८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT