

Sanjay Gandhi death anniversary
esakal
Sanjay Gandhi Death: २३ जून १९८० हा भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत धक्कादायक दिवस होता. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे छोटे सुपुत्र आणि त्यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे ३३ वर्षीय संजय गांधी यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. संजय गांधी यांना विमानाने हवेत कसरती करण्याचा प्रचंड छंद होता. २३ जूनच्या सकाळी ते आपले 'पिट्स एस २ए' हे टू-सीटर विमान घेऊन दिल्लीच्या आकाशात झेपावले. अचानक विमानाचे इंजिन बंद पडले आणि विमान थेट जमिनीवर कोसळले. राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.