मुंबई

मुंबईत विजेची मागणी ४,३२९ मेगावॉटवर

CD

मुंबईत विजेची मागणी ४,३२९ मेगावॉटवर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यातील तापमानाचा पारा वाढल्याने विजेच्या मागणीतही रेकाॅर्डब्रेक वाढ झाली आहे. मुंबईत आज दुपारी तीनच्या सुमारास तब्बल ४,३२९ मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदवली गेली. उकाड्यामुळे एसी, पुंखे, कुलरचा वापर वाढल्याने मुंबईत विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. मुंबईत २२ मे २०२४ रोजी सर्वाधिक ४,३०६ मेगावॉट विजेची मागणी नोंदली होती, तो टप्पा आज ओलांडला आहे.

वाढलेल्या तापमानाचा पारा आणि उकाड्यामुळे मुंबईकर सध्या घामाघूम होत आहेत. त्यामुळे गारव्यासाठी एसी, पंखे, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच कार्पोरेट कार्यालयातील मोठ्या क्षमतेचे एसी वातानुकूलित यंत्र) असल्याने आणि झोपडपट्ट्यांमध्येही एसीचा वापर वाढला आहे. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीचा आलेख चढता असून, आज विक्रमी ४,३२९ मेगावाॅट एवढी मागणी नोंदली आहे. दरम्यान, महावितरणकडून २५ ते २६ हजार मेगावाॅट एवढी मागणी नोंदली आहे.

८० टक्के वीज मुंबईबाहेरून
मुंबईत आज ४,३२९ एवढी विक्रमी मागणी नोंदली असून, ती पूर्ण करण्यासाठी सुमारे ८० टक्के वीज राज्यभरातून आणली गेली. यामध्ये मुंबईत वीज निर्मिती करणाऱ्या टाटा पाॅवरकडून ६०० मेगावाॅट तर अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या डहाणू वीज केंद्रातून सुमारे ३०० मेगावाॅट अशी एकूण ९०० मेगावाॅट वीज मुंबई आणि परिसरातून उपलब्ध झाली आहे, तर उर्वरित ३,४०० मेगावाॅटहून अधिक वीज मुंबईबाहेरून राज्यातून आणली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Tempo Accident : साताऱ्यात घरसामानासह म्हशी घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मायलेकींसह चौघांचा मृत्यू, दोन लहान मुले अद्यापही गायब

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT