मुंबई

इंद्राणीच्या परदेशगमनाला न्यायालयाचा नकार

CD

इंद्राणीच्या परदेशगमनाला न्यायालयाचा नकार
शीना बोरा हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला स्पेन आणि युनायटेड किंगड्म (यूके) येथे दोन आठवड्यांच्या परदेश प्रवासाची परवानगी देण्यास विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. ८) नकार दिला. इंद्राणी पळून जाण्याचा धोका असल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद फेटाळता येत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

शीनाच्या हत्येचा खटला अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे; तसेच तो नजीकच्या काळातच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यातच तपासणीसाठी आता केवळ मोजकेच साक्षीदार उरले आहेत. मुळात, इंद्राणी याप्रकरणी मुख्य आरोपी असून तिच्यावरील गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात खटला सुरू आहे. त्यातच तिच्याकडे यूकेचे नागरिकत्त्व असून, तिची यूके आणि स्पेनमध्ये स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे, ती पळून जाण्याचा धोका आहे, अशी सरकारी पक्षाने व्यक्त केलेली भीती पूर्णपणे नाकारता येत नाही, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी इंद्राणीची मागणी फेटाळताना स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मुखर्जीला खटल्यास विलंब झाल्यास प्रवासासाठी अर्ज करण्याची मुभा दिली होती, तरीही उच्च न्यायालयाने २०२४ पासून भारतात राहूनच आपल्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले, हे स्पष्ट करण्यात त्या अपयशी ठरल्याचे न्या. दरेकर यांनी नमूद केले. तसेच इंद्राणींनी आपल्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, परदेश प्रवासाची परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात दोन लाख रुपये जमा केल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. त्यामुळे सर्व तथ्ये, परिस्थिती आणि खटल्याची सद्यःस्थिती विचारात घेता, हा अर्ज फेटाळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.

आर्थिक अडचण
इंद्राणी मुखर्जीने परदेश प्रवासासाठी नव्याने अर्ज केला होता. त्यानुसार, यूके आणि स्पेनमधील तिची बँक खाती दहा वर्षांपासून ‘निष्क्रिय’ अवस्थेत असल्याने तिला तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आपल्याला परदेशात जाणे आवश्यक असून आपल्या अर्जाकडे अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थिती म्हणून तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी इंद्राणीने अर्जात केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT