मुंबई

टोकावडेला ‘जंक्शन गाव’ दर्जाची मागणी

CD

मुरबाड, ता. १० (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील टोकावडे हे गाव भौगोलिक आणि वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरत असून, या गावाला अधिकृतपणे ‘जंक्शन गाव’ म्हणून घोषित करण्याची मागणी आता जोर धरत आहे. करचोंडे येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश घरत यांनी शासनाकडे याबाबत मागणी केली आहे.

ठाणे, मुंबई, पुणे, शहापूर, नाशिक, शहाड, कल्याण, बदलापूर, कर्जत आणि खोपोली यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या विविध राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या संपर्कात टोकावडे गाव येत असल्याने या गावाचे वाहतुकीतील महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ तसेच कल्याण-अहिल्यानगर राज्य मार्गावर वसलेले टोकावडे हे गाव कर्जत, म्हसा, तळवली, बारागाव, खापरी, शिरोशी आणि तळेगाव या ग्रामीण भागांना जोडणारे प्रमुख केंद्र बनले आहे.

दररोज हजारो प्रवासी, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी या मार्गाचा वापर करत असून, टोकावडे येथे विविध दिशांना जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे एकत्र येते. त्यामुळे भविष्यात वाहतूक नियोजन, बस स्थानक विकास, व्यापारी बाजारपेठ, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनवाढ यासाठी टोकावडे गावाचा ‘जंक्शन हब’ म्हणून विकास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेश नारायण घरत यांनी सांगितले की, टोकावडे गाव हे मुरबाड तालुक्यातील वाहतुकीचे केंद्रबिंदू बनले असून, येथे आधुनिक बस स्थानक, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, दिशादर्शक फलक, पार्किंग सुविधा आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उभारल्यास संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs LSG Live : उर्विल पटेलने झळकावले आयपीएलमधील वेगवान अर्धशतक; हात जोडले अन् खिशातून कागद काढला.. काय लिहिलं होतं?

Mumbai Local: रात्रीही लोकलमध्ये टीसी फिरणार, २४ तास तिकीट चेकिंग होणार; रेल्वे प्रशासनाची विशेष "बॅटमॅन" मोहीम

MS Dhoni: 'थाला' पुन्हा मैदानात दिसेल; धोनीच्या चाहत्यांनी आता आशा सोडावी का...? वास्तव स्वीकारण्याची वेळ आली!

Latest Marathi News Live Update: डोंबिवलीनजीक रुणवाल गार्डनमध्ये पाणीटंचाई, नागरिकांचा बिल्डर कार्यालयावर मोर्चा

PCOS & IVF Failure Causes: PCOS, अनियमित पाळी आणि IVF Failure मागे स्ट्रेस कारणीभूत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT