मुंबई

दादर स्थानकालगतची कचरा कुंडी हलवली

CD

दादर स्थानकालगतची कचरा कुंडी हलवली
धारावी, ता. १० (बातमीदार) : दादर स्थानक येथे फलाट क्रमांक १२ वरून परळ दिशेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेली कचरा कुंडी अखेर हलवण्यात आली आहे. ‘सकाळ’च्या शुक्रवारच्या (ता. ८) अंकात याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने साफसफाई मोहीम राबवत कचरा कुंडी हटवली.
प्रवेशद्वाराजवळील कचऱ्याचे डबे ओसंडून वाहत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत होता. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. याच परिसरात रेल्वे युनियन कार्यालय तसेच दादर लोहमार्ग पोलिस ठाणे असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. यापुढेही स्वच्छता राखली जाईल, अशी माहिती दादर स्थानकाचे स्थानक प्रबंधक देवमनी रा. तिवारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT