मुंबई

अनाथांच्या संघर्षाला उपमुख्यमंत्र्यांचे बळ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : आयुष्याच्या प्रवासात आई-वडिलांचे छत्र हरवलेले असतानाही केवळ जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या चार विद्यार्थ्यांच्या संघर्षाची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्यासोबतच त्यांच्या भविष्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे. एकाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, तर दुसऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर घडवायचे आहे. विद्यार्थ्यांच्या या ध्येयांची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या आवडीच्या शाखांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश तातडीने ‘आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयात’ निश्चित करण्यात यावेत, असे निर्देश संस्थेचे सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांना देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका आणि रेनबो फाउंडेशन संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ५५ ते ७२ टक्क्यांपर्यंत गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ प्रवेशाची व्यवस्था करण्यापुरतेच मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक असलेला आधार देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या चारही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि उज्ज्वल भवितव्याचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT