मुंबई

रेल्वेच्या जागेत बेकायदा ३५ ट्रक माती

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवलीतील बावनचाळ परिसरातील रेल्वेच्या मालकीच्या मैदानात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तब्बल ३५ ट्रक माती टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाकलेल्या मातीची किंमत सुमारे सव्वा पाच लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
डोंबिवलीतील बावनचाळ परिसर हा रेल्वेच्या मालकीचा विस्तीर्ण भूभाग आहे. सुमारे ६५ एकरांहून अधिक क्षेत्रफळ या परिसरात आहे. यापैकी १५ ते २० एकर परिसर झाडाझुडपांनी वेढलेला असून काही भाग मोकळा आहे. ठाकुर्ली पुलावरून उतरल्यानंतर गणेशनगर आणि महात्मा गांधी रस्ता परिसरात जाण्यासाठी नागरिक या मैदानातील मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या भागात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते.
दरम्यान, ठाकुर्ली विभागाचे रेल्वे अभियंता वासुदेव वासदकर हे सहकाऱ्यांसह बावनचाळ परिसराच्या पाहणीसाठी आले असता सुरुवातीला कोणतेही अतिक्रमण आढळले नव्हते. मात्र, दोन दिवसांनंतर पुन्हा पाहणीदरम्यान क्रिकेट मैदानालगतच्या झाडीत मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भात चौकशी केली असता रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वरिष्ठ अभियंता बिनयकुमार यांना माहिती देण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून हा प्रकार नियमबाह्य असल्याचे निष्पन्न केले. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकसहभागातून उभे राहिले मैदान
काही वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे माजी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वखर्चातून परिसरात स्वच्छता मोहीम राबवून हा भाग नागरिकांसाठी खुला केला होता. कचरा आणि घाणीने भरलेला परिसर साफ करून काही भाग सपाट करण्यात आला. त्या ठिकाणी खेळाचे मैदान, बाकडे आणि बसण्याची सुविधाही उभारण्यात आली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणाच्या कारणावरून या सुविधा दोन वेळा हटवल्या होत्या. नंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर त्या पूर्ववत करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT