नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील अमली पदार्थविरोधी पथकाने नेरूळ आणि सीवूड्समध्ये धडक कारवाई करत दोन सराईत अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून सहा लाख ६० हजारांचा ६८ ग्रॅम उच्च दर्जाचा ‘हायड्रो गांजा’ जप्त केला. या रॅकेटमध्ये सहभागी असलेले इतर तीन संशयित फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थविरोधी पथक शनिवारी (ता. ९) नेरूळ परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना साहील शब्बीर लांबे (वय २७) हा तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६६.७ ग्रॅम हायड्रो गांजा सापडला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता, या अमली पदार्थांच्या तस्करीचे धागेदोरे सीवूड्सपर्यंत पोहोचले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सीवूड्स येथील ए. एन. हिल व्ह्यू इमारतीमध्ये छापा टाकला. तेथून नशवान मुबाज बगदादी (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले. नशवानकडूनसुद्धा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत या टोळीतील इतर तीन आरोपी फरार असून त्यातील नीलेश सिंग हा नवशान याचा भागीदार आहे, तर अन्वर ऊर्फ अली हा त्यांना अमली पदार्थ आणून देत असल्याचे तपासात आढळून आले आहे आणि आकाश मोरया याला नवशान अमली पदार्थ विकत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.