तेलंगणाहून पालघरपर्यंत अनवाणी प्रवास
अध्यात्म, श्रद्धा, भक्तीच्या प्रसाराचा अनोखा संकल्प
मनोर, ता. ११ ः सद्गुरू परब्रह्म प्रेममया महागुरू यांच्या भक्ताने ‘श्री धर्म पुण्य पदयात्रा महोत्सवा’अंतर्गत तब्बल ७६६ किलोमीटरचे अंतर अनवाणी पायी पार करत अध्यात्म, श्रद्धा, भक्तीचा अनोखा संदेश दिला आहे. तेलंगणातील हैदराबाद येथील श्रीभवती क्षेत्रम येथून त्रिलोक्यनाथ (वय ३२) यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी पदयात्रेला सुरुवात केली होती. धर्म, अध्यात्म आणि भक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भक्ताच्या या दृढनिश्चयाचे आणि आध्यात्मिक समर्पणाचे परिसरात कौतुक होत आहे.
---------------------
३३ दिवसांची यात्रा
पालघर तालुक्यातील दहिसरतर्फे मनोर येथील श्रीयोग भूक्षेत्रम आश्रमात पोहोचून सांगता केली. तेलंगणातील हैदराबाद येथून सुरू झालेली ही पदयात्रा तब्बल ३३ दिवस अखंड पायी प्रवासानंतर रविवारी पूर्ण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.