मुंबई

भिवंडीत १७ महिन्यांपासून अखंड योगाभ्यास

CD

भिवंडी, ता. १२ (बातमीदार) : अशोकनगर परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात १७ महिन्यांपासून दररोज सकाळी प्रार्थनेसह मोफत योगासन सत्र घेतले जात आहे. एकही दिवस खंड न पडता हा उपक्रम सुरू आहे. यंत्रमाग व्यावसायिक आणि भजन गायक पंडित श्यामनाथ शर्मा यांच्या पुढाकारातून हा आरोग्यदायी उपक्रम राबविला जात आहे.
अशोकनगरसह मानसरोवर, कल्याण रोड आणि टेमघर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने या योगासन सत्रात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे तरुणांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो. योगगुरू पंडित श्यामनाथ शर्मा यांनी सांगितले, ‘पहिले सुख निरोगी काया’ या उक्तीचा विचार करून १ नोव्हेंबर २०२४ मध्ये श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात या दैनंदिन योगासन सत्राची सुरुवात केली. तेव्हापासून हा उपक्रम अखंड सुरू असून एकही दिवस विश्रांती घेतलेली नाही. मानवी हृदय २४ तास अविरतपणे कार्यरत असते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेला व्यायाम दैनंदिन जीवनाचा भाग असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

आजारांवर नियंत्रण
दररोज नियमित योगासने करणाऱ्या सहभागी नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने लक्षणीय लाभ होत असल्याचा दावा त्यांनी केला. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड विकार आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास अनेकांना मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

भजनांच्या तालावर योगासने
या सत्रात विविध योगासने भजनांच्या सुमधुर तालावर केली जातात. योगासन सत्रानंतर सहभागी प्रभू श्रीराम नामाचा जप करत टाळ्यांच्या गजरात १०८ फेऱ्या पूर्ण करतात. त्यानंतर १२ वेळा सूर्यनमस्कार घालून सत्राची सांगता होते. हे योगासन सत्र दररोज सकाळी ६.४५ ते ८ वाजेपर्यंत आयोजित केले जाते. अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्यदायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित श्यामनाथ शर्मा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT