मुंबई

ओवे कॅम्प गावातील भीषण पाणीटंचाई

CD

ओवे कॅम्प गावातील भीषण पाणीटंचाई
टँकरवर ग्रामस्थांची भिस्त; रस्त्यावर ड्रमच्या रांगा
खारघर, ता. ११ (बातमीदार) : खारघर परिसरातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसित ओवे कॅम्प गाव सध्या भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कोयना धरण प्रकल्प उभारताना १९६२ मध्ये बाधित झालेल्या गावांचे विविध भागांत पुनर्वसन करण्यात आले होते. त्या वेळी शासनाकडून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार खारघर येथील टाटा हॉस्पिटलच्या मागील बाजूस ओवे कॅम्प गावाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायत कार्यरत असताना गावात रस्ते, गटारे, पाणीपुरवठा यांसारखी छोटी-मोठी विकासकामे केली जात होती. मात्र, पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही गावातील अनेक प्रश्न प्रलंबितच राहिल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. विशेषतः नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. उन्हाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

तीन ते चार दिवसांतून एकदाच पाणी
गावातील वाढती लोकसंख्या आणि सिडकोकडून होणारा अपुरा पुरवठा यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. सध्या गावात तीन ते चार दिवसांतून केवळ एकदाच पाणी येत आहे. पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पडत आहे. परिणामी, पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी रहिवाशांना रस्त्यावर ड्रमच्या रांगा लावून तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

दुरुस्तीच्या कामांचा हवाला
यासंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात विचारणा केली असता, सिडकोकडून टाटा कॅन्सर रुग्णालयालगत व्हॉल्व दुरुस्ती कामे सुरू आहे. उद्यापासून पुरेसे पाणीपुरवठा उपलब्ध होईल. तसेच, गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. पालिकेकडून खारघर सेक्टर ३० डोंगराच्या पायथ्याशी ५४ दशलक्ष लिटर जलकुंभाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गावात भीषण पाणीटंचाई आहे. टँकरद्वारे मिळालेले पाणी साठवून त्या पाण्यात तीन ते चार दिवस काढावे लागत आहे. सिडकोकडून पुरेसे पाणी मिळत नाही. पालिकेने टँकरची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
- मनीषा रेवणे, ग्रामस्थ ओवे कॅम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT