मुंबई

गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षण समिती बैठकीत गौरव

CD

गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षण समिती बैठकीत गौरव
पालिका शाळांचे दहावीत घवघवीत यश; ७७ शाळांचा शंभर टक्के निकाल
मुंबई, ता. ११ ः दहावीच्या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षण घेणारे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. यात ७७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६६ विद्यार्थ्यांनी ९० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले आहेत. यात आज महापालिका शाळांतून प्रथम, द्वितीय आदी क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापालिका शिक्षण समितीच्या झालेल्या बैठकीत सत्‍कार करण्यात आला.
महापालिका उपायुक्त प्राची जांभेकर, शिक्षण समितीच्या प्रमुख राजेश्री शिरवडकर यांच्यासह महापालिकेतील शिक्षण समितीतील सदस्य उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. शिक्षण विभागाने गेल्या काही वर्षांत राबवलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सकारात्मक परिणाम यंदाच्या निकालातून स्पष्टपणे दिसून आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून एकूण १५,९०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४,६४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, महापालिका शाळांचा सरासरी निकाल ९२.०८ टक्के इतका लागला आहे. महापालिका शाळांमधून प्रथम, द्वितीय तसेच इतर गुणवत्ता क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव आज महापालिका शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आला. दहावीचा हा एकूण निकाल पाहता महापालिकेतील शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने सुधारत असल्याचे दिसून येत असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

या विद्यार्थ्यांचा गौरव
सिताराम मिल कंपाउंड एमपीएस महापालिका माध्यमिक शाळेतील स्वयंम शेखर गोरेगावकर याने ९७.४० टक्के गुण मिळवत महापालिकेतील सर्व शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. डी. एन. नगर एमपीएस माध्यमिक शाळेच्या अशिया जाकीर सय्यद हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच प्रभादेवी एमपीएस माध्यमिक शाळेचा दीपक अरुण तिवारी आणि गोखले रोड एमपीएस माध्यमिक शाळेची जिनल हरेश सुमेसरा यांनी प्रत्येकी ९५.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांचा विभागाकडून गौरव करण्यात आला.

गुणवत्तेसाठी असे होतात प्रयत्न
महापालिका शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी ‘मिशन मेरिट’सारखे विशेष उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सराव पुस्तिका, गणित विषयासाठी विशेष मार्गदर्शन, बोर्डाच्या धर्तीवर सराव प्रश्नपत्रिका, तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या नियमित बैठका यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. अधिकारी स्तरावर शाळा दत्तक देऊन शैक्षणिक मार्गदर्शनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने समन्वय साधत निकालवाढीसाठी प्रयत्न करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR 4 Rule: करदात्यांसाठी मोठा नियम! ITR-4 फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल; फ्रीलान्सर आणि छोट्या व्यावसायिकांना धक्का

IPL 2026 Controversy : टीम डेव्हिडवर बंदीची कारवाई? RCB vs MI सामन्यात नको ते करून बसलाय... Viral Video ची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांचा तब्बल 1 लाख कोटींचा तोटा! पेट्रोल-डिझेल महागणार? पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : प्रशासनाच्या दिरंगाईला सतीश घाटगे यांचे सडेतोड उत्तर

'प्रेमाचा खेळ सारा, सुना येती घरा...' स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT