उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : शहरात एकीकडे पाणीकपातीच्या संकटामुळे नागरिकांचा घसा कोरडा पडत आहे. मात्र, दुसरीकडे शहाड पूर्वेतील उड्डाणपुलाजवळ रविवारी (ता. १०) मुख्य जलवाहिनी फुटल्याने अक्षरशः पाण्याचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. रस्त्याच्या कामादरम्यान ही जलवाहिनी फुटल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. परिणामी लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत गटारात जात आहे. पालिका प्रशासनाने सोमवारी (ता. ११) दुपारपर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने हलगर्जी कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
उंच उसळणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. काही नागरिक पाण्याच्या टंचाईमुळे थेट फुटलेल्या वाहिनीमधून पाणी भरताना दिसले, तर लहान मुले या पाण्यात खेळताना दिसत होती. विशेष म्हणजे शनिवार-रविवार सुट्टी असल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. एकीकडे एमआयडीसीकडून पाणीकपातीच्या सूचना दिल्या जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागते आणि इथे प्रशासनाच्या निष्काळजीमुळे पाणी रस्त्यावर वाहतेय, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. दरम्यान, ही फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.