मुंबई

दादांच्या पश्चात रायगड जिल्ह्याकडे विशेष लक्ष देणार

CD

रायगडकडे विशेष लक्ष देणार!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

रोहा, ता. ११ (बातमीदार) : “कोकण ही स्वर्गीय अजितदादांची आवडती भूमी होती. त्यांनी मंत्रिमंडळात काम करताना कोकणाच्या विकासासाठी भरभरून निधी दिला. आज दादा आपल्यात नसले तरी त्यांच्या पश्चात रोह्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जाईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज रायगड येथे दिली.
रोहा-अष्टमी नगरपालिकेतर्फे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे होते. या वेळी मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, नगराध्यक्ष वनश्री शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर आलेल्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांची मने जिंकली. ‘रायगड ही स्वराज्याला राजा देणारी ऐतिहासिक भूमी आहे. याच भूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यासाठी संघर्ष केला,’ असेही त्या म्हणाल्या. आज ज्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, ती कामे पूर्ण झाल्यानंतर लोकार्पणासाठी पुन्हा नक्की येईन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दादांच्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ४ ऑक्टोबर २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहाच्या लोकार्पणाचा ध्वनिचित्रफितीचा भाग दाखविण्यात आला. यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत आठवणी दाटून आल्या. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून रोहा शहरासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची माहितीही ध्वनिचित्रफितीद्वारे सादर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

SCROLL FOR NEXT