मुंबई

वाशीमध्ये एटीएममध्ये कार्ड अडकवून फसवणूक;

CD

वाशीमध्ये एटीएममध्ये कार्ड अडकवून फसवणूक
महिलेच्या खात्यातून लांबवली ५७ हजारांची रक्कम
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : एटीएम मशीनमध्ये कार्ड अडकल्याची संधी साधून आणि कस्टमर केअरच्या नावाखाली पासवर्ड मिळवून दोघा चोरट्यांनी कोपरखैरणेतील एका महिलेच्या खात्यातून ५७ हजार रुपये लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील दोघा चोरट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार ३ मे रोजी सायंकाळी वाशी सेक्टर १० येथील मिनी मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. शॉपिंगसाठी पैसे कमी पडल्याने त्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. या वेळी त्यांनी १५०० रुपये काढल्यानंतर त्यांचे डेबिट कार्ड अचानक मशीनमध्ये अडकले. त्यामुळे कार्ड काढण्याचा ते प्रयत्न करत असतानाच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका चोरट्याने त्यांना मदत करण्याच्या बहाणा करत, त्यांना मशीनच्या बाजूला चिकटवलेल्या एका कागदावर संपर्क साधण्यास सांगितले.
महिलेने चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तेथील कागदावर लिहिलेल्या क्रमांकावर साधला असता, समोरील व्यक्तीने कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून या महिलेला एटीएममधील एंटर आणि कॅन्सल ही दोन बटणे एकत्र दाबून आपला पिन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने आपला पिन नंबर टाकताच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या चोरट्याने त्यांच्या एटीएम कार्डचा पिन नंबर चोरून पाहिला. या वेळी कार्ड बाहेर न आल्याने तसेच मुलगी रडत असल्याने ही महिला कार्ड तिथेच सोडून घरी निघून गेली.
त्यानंतर अर्ध्या रस्त्यातच या महिलेच्या मोबाईलवर १० हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी तातडीने पतीला कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले, परंतु तोपर्यंत चोरट्यांनी एकूण ५७ हजार रुपये खात्यातून काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी (ता. ७) वाशी पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT