मुंबई

‘बीकेसी’तील ९ भूखंड विक्रीला

CD

‘बीकेसी’तील नऊ भूखंड विक्रीला
‘एमएमआरडीए’चे ९,२८४ कोटींचा निधी उभारण्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारणाऱ्या ‘एमएमआरडीए’ने वांद्रे-कुर्ला संकुलातील तब्बल नऊ भूखंड विक्रीसाठी (८० वर्षांच्या भाडेकरारावर) काढले आहे. बीकेसीतील ‘जी’ ब्लाॅकमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेले व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी राखीव असलेल्या या भूखंडाच्या माध्यमातून तब्बल नऊ हजार २८४ कोटी रुपये कमाई करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
एमएमआरडीएकडून सध्या मेट्रो प्रकल्प, भुयारी मार्ग, रस्ते असे वेगवगेळे प्रकल्प राबवले जात असले तरी त्यांना निधीची चणचण जाणवते. त्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी बीकेसीतील भूखंड दीर्घ काळाच्या मुदतीवर भाडेतत्त्वावर देण्याचे नियोजन केले असून त्यासाठी इच्छुकांकडून २५ जूनपर्यंत निविदा मागवल्या आहेत. दरम्यान, वर्षभरापूर्वी निवास भूखंडाच्या विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता काढलेल्या निविदेत दोन भूखंडांचा समावेश करण्यात आला आहे.

या भूखंडाचा समावेश
प्लाॅट - क्षेत्रफळ (चौरस मीटरमध्ये) - राखीव किंमत (कोटींमध्ये)
सी ७३ - ६,५८७ - १,२७१
सी ७४ - ६,८३० - १,३१९
सी ७५ - ७,४१५ - १,४३२
सी ७६ - ६,४३७ - १,२४३
सी ७७ - ७,००० - १,३५२
आर १.५ - ५,४०९ - ७६१
आर १.६ - ४,९७४ - ७००
आर १.७ - ५,८७६ - ८२७
आर ५ - २,६६३ - ३७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT