मुंबई

‘समान काम-समान वेतन’ प्रकरणाला गती

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ८० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ‘समान काम-समान वेतन’ प्रकरणाला अखेर गती मिळाली आहे. कामगारांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीवेळी न्यायालयाने, संबंधित रकमेची पडताळणी करून कामगारांना देयके अदा करावीत, असे निर्देश महापालिकेला दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे पालिका खडबडून जागी झाली असून थकीत वेतन अदा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती नियुक्त केली आहे. या समितीवर कामगारांच्या देयकांची पडताळणी आणि अदा प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या जवळपास २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेचा तपशील न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर ३० एप्रिलला झालेल्या सुनावणीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी चार आठवड्यांत सर्व थकीत रक्कम अदा करण्यात येईल, असे हमीपत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाने हे आश्वासन स्वीकारत महापालिकेला पुढील कार्यवाहीस परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी ५ मे रोजी विशेष कार्यालयीन आदेश जारी करून चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे.
या समितीवर ८० कर्मचाऱ्यांची पडताळणी करणे, वेतनातील फरकाची कर्मचारीनिहाय देयके तयार करणे; तसेच वित्त व लेखा विभागामार्फत त्यांची तपासणी करून अंतिम मंजुरीनंतर रक्कम अदा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही प्रक्रिया १४ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून कार्यवाहीचा अहवाल सरकारला सादर करण्याबरोबरच अंतिम पूर्तता अहवाल उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या या प्रकरणात अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्याने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समितीत कोणाचा सहभाग
पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी काढलेल्या कार्यालयीन आदेशानुसार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिपक शिंदे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे आणि मुख्य विधी अधिकारी मकरंद काळे यांची समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS प्रकरण; आरोपी तौसीफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT