मुंबई

घाटकोपरमध्ये ३१ मे’ला मोफत वैद्यकीय शिबिर

CD

ठाणे (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम येथील परमकेशव बाग येथे ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत भव्य मोफत वैद्यकीय आणि रक्तदान शिबिर होणार आहे. आयएमएएनएबीएस, जेव्हीएम चॅरिटेबल फाउंडेशन आणि श्री गोहेलवाड विनायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार असून ‘टीम समृद्धी’चा पाठिंबा लाभला आहे.
शिबिरात हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, दीर्घकालीन साखर तपासणी, कोलेस्टेरॉल तपासणी; तसेच थायरॉईड तपासणीसह विविध रक्तचाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. रक्तदाब, हृदय तपासणी, डोळ्यांची तपासणी, हाडांची घनता तपासणी, यकृत तपासणी, फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी आणि श्रवणदोष तपासणीची सुविधाही उपलब्ध असणार आहे. विशेष सुविधा म्हणून पहिल्या ३० महिलांसाठी स्तन तपासणी आणि पहिल्या २५ महिलांसाठी गर्भाशय मुख तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रक्तदान मोहिमेद्वारे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२६९०१९०२ किंवा ९३२४०६८१८६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT