मुंबई

‘अशोई-द झोरोस्ट्रियन आर्ट ऑफ सक्सेस अँड इमॉर्टलिटी’ पुस्तकाचे प्रकाशन

CD

प्रभादेवी, ता. १२ (वार्ताहर) : ‘अरीज खंबाटा बेनिव्होलंट ट्रस्ट’ व ‘रसना फाउंडेशन’चे संस्थापक विश्वस्त पिरुज अरीज खंबाटा यांनी, त्यांच्या अशोई : यशाची आणि अमरत्वाची झोरोस्ट्रियन कला. यासोबतच, पारशी समुदायामध्ये आणि त्याबाहेरही उद्योजकता व नेतृत्वगुणांना चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एका ‘उद्योजकता निधीची घोषणा करत अशोई-द झोरोस्ट्रियन आर्ट ऑफ सक्सेस अँड इमॉर्टलिटी’ पुस्तकाचे प्रकाशन केले.

या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (ता. ९) चर्चगेट मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार विभागाचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित होते. या वेळी राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (निवृत्त) न्या. शाहरुख जे. काथावाला, उदवाडा येथील ‘इराणशाह आताश बेहराम’चे मुख्य धर्मगुरू वडा दस्तुरजी खुर्शेद दस्तूर आणि ‘मोदींचे अभियान’ या पुस्तकाचे लेखक व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य बर्जिस देसाई यांचीही उपस्थिती होती.

‘अशोई : यशाची आणि अमरत्वाची झोरोस्ट्रियन कला’ हे पुस्तक झोराष्ट्रियन धर्माच्या तीन हजार वर्षांहून अधिक जुन्या ज्ञानातून घेतलेल्या ५१ कालातीत तत्त्वांवर आधारित आहे. हे पुस्तक नेतृत्व, चांगला स्वभाव, कुटुंब आणि व्यवसाय यशस्वीपणे घडवण्यासाठी एक प्रभावी मार्गदर्शक म्हणून काम करते. पारशी समाजाने व्यवसाय क्षेत्रात मिळवलेले यश, जगभरात स्वतःला यशस्वीपणे जुळवून घेण्याची क्षमता तसेच प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेसाठी मिळालेली ओळख यामागील कारणे समजावून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT