मुंबई

सोनारांकडून सोने खरेदी करण्याचे आवाहन!

CD

सोने खरेदी टाळू नका!
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोनारांचे सामाजिक माध्यमांवर साकडे
बेलापूर, ता. १२ (बातमीदार) ः परकी चलन वाचवण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ऐन लग्नसराईच्या हंगामात केलेल्या या आवाहनामुळे झवेरी बाजारासह स्थानिक सुवर्ण व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील ज्वेलर्सनी आता ‘सोने खरेदी थांबवू नका’ अशा आशयाचे आवाहन सामाजिक माध्यमातून ग्राहकांना केला आहे.
वाढती महागाई आणि जागतिक युद्धांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासियांना सोने खरेदी टाळणे, परदेशी प्रवास टाळणे आणि इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. मे महिना हा लग्नसराई आणि साखरपुड्यांचा काळ असल्याने दागिन्यांना मोठी मागणी असते. मात्र, खुद्द पंतप्रधानांनीच आवाहन केल्यामुळे अनेक नागरिक सोने खरेदीबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. परिणामी, दागिन्यांच्या दुकानांमध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यामुळे लहान-मोठे ज्वेलर्स अडचणीत आले असून, त्यांनी आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. सोने खरेदी टाळू नका, वर्षभरात सोन्याचे भाव वाढले तर काय कराल? किंवा सोने हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे, अशा पोस्ट सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर व्हायरल केल्या जात आहेत. सोन्याची गुंतवणूक ही भविष्यातील सुरक्षितता असल्याचे सांगून ग्राहकांना दुकानाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सोने खरेदी का करू नये. जागतिक समस्या समजू शकतो. मात्र, सर्वसामान्यांचे काय? लग्नसोहळे असो अथवा गुंतवणूक सोने हे एक महत्त्वाचे माध्यम आहे.
- गणेश जगताप, न्यू श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स, नेरूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT