मुंबई

रिक्षा मीटरप्रमाणे नेण्यास नकार दिला तर कारवाईचा बडगा

CD

रिक्षा मीटरप्रमाणे नेण्यास नकार दिला, तर कारवाईचा बडगा
उपप्रादेशिक विभाग उभारणार तक्रार निवारण केंद्र

वसई, ता. १२ (बातमीदार) : वसई़-विरार शहरातील रिक्षाचालक मीटरने रिक्षा प्रवासास नकार देतात. या वाहतुकीबाबत भेडसावणाऱ्या समस्येबाबत आमदार स्नेहा दुबे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रिक्षाचालक जर मीटरप्रमाणे प्रवासासाठी नकार देत असेल, तर यासंदर्भातील कारवाईसाठी तक्रार निवारण केंद्र उभारण्याचे निर्देश दुबे यांनी उपप्रादेशिक विभागाला दिले.

वसई-विरार परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण, रिक्षा व्यवस्थापन तसेच रेल्वे विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १२) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रशासन, वाहतूक विभाग आणि रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडली. सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन वाहतूक समस्या, रिक्षाचालकांकडून मीटरप्रमाणे प्रवासास देण्यात येणारा नकार, रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, वाहनतळाची अपुरी जागा आणि खराब रस्ते यामुळे रिक्षाचालकांना येणाऱ्या अडचणी या विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच परिवहन विभागाच्या स्वतंत्र कार्यालयासाठी सनसिटी, उमेळा आणि पाचूबंदर परिसरात सुमारे दोन एकर जागेची आवश्यकता असल्याने त्यासाठी परिवहन विभागाने शासनाकडे मागणी करण्याचे व त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे या वेळी आमदार स्नेहा दुबे यांनी आश्वासित केले. या बैठकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दीपक उगले, वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत लांगी, पोलिस उपनिरीक्षक नितीन जाधव, संदेश मेहेर, रेल्वे विभागाचे अवधेश कुमार पांडे, योगेश कुशवाह, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा-टॅक्सीचालक मालक संघटनेचे विजय खेतले, वसई रिक्षा युनियनचे अक्षय शुक्ला, जय महाराष्ट्र रिक्षाचालक मालक संघटनेचे अरविंद सिंग, बिजेंद्र कुमार, मयंक शेठ उपस्थित होते.

-------------
बेकायदा रिक्षांवर कठोर कारवाई
वसई-विरार शहरात परमिट नसलेल्या रिक्षांमुळे निर्माण होणारी बेकायदा प्रवासी वाहतूक, नागरिकांची सुरक्षा, महसूल उत्पन्नाचे नुकसान या रिक्षाचालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची परिवहन अधिकाऱ्यांनी दखल घेऊन बेकायदा रिक्षांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.
--------------
वसई-विरार शहरात वाहतुकीबाबत निर्माण होणाऱ्या समस्या निकाली निघाव्या, तसेच मीटर प्रमाणे भाडे घेण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना प्रवास करण्यास अडचण निर्माण होत आहे. याबाबत योग्य ती अंमलबजावणी करावी, अशा उपप्रादेशिक विभाग अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. कार्यवाहीबाबत पुन्हा बैठक घेणार आहोत.
- स्नेहा दुबे, आमदार, वसई
----------
वसई : आमदार स्नेहा दुबे यांनी उपप्रादेशिक विभागासोबत बैठक घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT