मुंबई

झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

CD

ठाणे, ता. १२ : ठाणे पश्चिमेतील शिवाईनगर परिसरात एका २३ वर्षीय प्रवीण वानखेडे या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी समोर आली. ही घटना हनुमान मंदिराजवळ घडली असून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच वागळे अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी पष्टे, वर्तकनगर पोलिस कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह झाडावरून खाली उतरवून तो वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह शववाहिकेतून पुढील तपासणी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात ६ लाखांचे 'MD' ड्रग्ज जप्त

SCROLL FOR NEXT