मुंबई

आयुक्तांच्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना काटकसरीच्या सूचना

CD

पनवेल महापालिकेत काटकसरीचे पर्व
आयुक्त मंगेश चितळे यांनी जारी केली नवी नियमावली

पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ऊर्जा आणि इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कडक काटकसरीची नियमावलीच तयार करुन दिली आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी महापालिका मुख्यालयातील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे उपस्थित होते. याचबरोबर सर्व अधिकारी व विभागप्रमुखांची ऑनलाइन बैठक घेऊन आयुक्तांनी सूचना दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणाच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांनादेखीलही सूचनांचे पत्र आले असून त्यानुसार आयुक्तांनी काटकसरीची नियमावली जाहीर केली आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात ऊर्जा आणि पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करण्यावर भर देण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. यानुसार, कार्यालयांमध्ये विजेचा वापर काटकसरीने करावा आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाश यंत्रणांचा वापर करावा. हरित ऊर्जा उपकरणांना प्राधान्य द्यावे तसेच विद्युत विभागाने सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे निर्देश दिले आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यालयांमधील वातानुकूलिन यंत्रणेचा संयमाने वापर करण्याबाबत आयुक्तांनी या वेळी सूचना दिल्या. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर तसेच दालनातील दिवे आणि एसी बंद करूनच बाहेर पडावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करताना पाणीपुरवठा विभागाने गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

वाहन वापराबाबतही महत्त्वाच्या सूचना
सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढवावा, शक्यतो कार-पूल करावा (चार अधिकाऱ्यांनी एकत्रपणे शेअरिंग प्रवास करावा) आणि शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी शासकीय वाहनांचा वापर टाळावा, असे सांगितले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा सार्वजनिक बसने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर ऊर्जा, पाणी आणि इंधन यांसारखी नैसर्गिक संसाधनांचा जपून आणि कार्यक्षम वापर करणे ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यामध्ये महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याची सामूहिक जबाबदारी आहे. काटकसरीच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून पनवेल महापालिका पर्यावरणपूरक आणि जबाबदार प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT