मुंबई

दिवाळे कोळीवाड्यात योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

दिवाळे कोळीवाड्यात योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारे पाचदिवसीय मोफत योग शिबिर दिवाळे कोळीवाडा येथे उत्साहात पार पडले. भारतीय योग संस्थान, (जिल्हा नवी मुंबई) यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
१० ते १४ मेदरम्यान ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे पार पडलेल्या या शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत योगाभ्यासाचा लाभ घेतला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. योगामुळे मानसिक तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते, असे यावेळी सांगण्यात आले.
लठ्ठपणा, पाठदुखी, सांधेदुखी आणि दैनंदिन तणावावर मात करण्यासाठी योग प्रभावी उपाय असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शिबिरात मार्गदर्शक म्हणून राजकुमारी सिंह, शिबिर प्रमुख जनार्दन सिंह, उपक्रम प्रमुख देवब्रत चटर्जी तसेच ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांनी सहभाग घेतला.
देवा फाउंडेशनतर्फे भूषण गंगेश कोळी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे आरोग्य जनजागृती वाढविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20 Petrol Hardeep Singh Puri : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळले जाते? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितल; सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा संदर्भ

काशी विश्वनाथ मंदिरात जवानाच्या बंदुकीतून अचानक सुटली गोळी, ३ जण जखमी

Latest Marathi Live Update: गेल्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Amba Ghat Landslide : आंबा घाटात मोठी दरड कोसळली! रत्नागिरी-नागपूर महामार्गावर एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून अलर्ट

Akola: कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग; २९ हजारांवर कर्जखाती अपलोड; अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

SCROLL FOR NEXT