मुंबई

पाणीकपातीच्या कालावधीत नियमित वेळेत पाणीपुरवठा करावा

CD

पाणीकपातीच्या कालावधीत नियमित वेळेत पाणीपुरवठा करावा
अतिरिक्त पालिका आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई. ता. १५ ः पावसाळापूर्व नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात शुक्रवारपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या कालावधीत सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये तसेच नियमित वेळेत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजित बांगर यांनी दिले.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिक परिणामकारक वापर करता यावा, यासाठी पालिका प्रशासनाने पाणीकपात लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर जल अभियंता विभागातील दुय्यम अभियंता व सहायक अभियंता यांची बैठक गुरुवारी पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यासोबत संवाद साधला.
अभिजित बांगर म्‍हणाले की, १० टक्‍के पाणीकपातीमुळे उंच भाग, टोकाचा भाग/ दूरच्‍या अंतरावरील भाग, पुरवठ्याचा कालावधी कमी असणारा भाग आदी विविध ठिकाणी पाणीपुरवठ्याकामी अडचणी निर्माण होऊ शकतात. जल अभियंत्याना परिसराची भौगोलिक रचना, पाणी वितरण व्‍यवस्‍थेची अचूक माहिती असते. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन प्रभागनिहाय सूक्ष्म स्तरावर नियोजन करावे. कृती आराखडा तयार करावा. तसेच उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. याचे नियोजन, अंमलबजावणीदरम्‍यान उद्भवलेल्‍या अडचणी याची सविस्‍तर माहिती सादर करावी, असे निर्देशही बांगर यांनी या वेळी दिले.

पाणीकपातीच्‍या काळात अभियंते, अधिकारी यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी उपस्थित रहावे. स्‍थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्‍याशी सातत्‍याने संवाद साधावा. पाणी वितरण व्‍यवस्‍थेबाबत लोकप्रतिनिधींना वेळोवळी अवगत करावे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आल्‍यास त्‍या तातडीने हाताळाव्‍यात. वरिष्‍ठांना त्‍याबाबत माहिती द्यावी. तक्रारींचा निपटारा करण्‍यास विलंब झाला, तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्तांनी दिला.

कठोर कारवाई करा
जलवाहिन्यांवर अथवा थेट नळजोडणीवर अनधिकृतरीत्या विद्युत मोटार (पंप) लावून पाणी उपसा करणाऱ्याविरुद्ध महापालिका प्रशासनाकडून कठोर व अधिक तीव्रतेने कारवाई करावी. अशा प्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT