मुंबई

क्षयरोगाशी झुंजणाऱ्या चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : क्षयरोगाशी झुंज देणाऱ्या बालरुग्णांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्यासाठी ठाणे महापालिका आणि ‘मेक अ विश फाउंडेशन’च्या वतीने सोमवारी विशेष उपक्रम राबविण्यात आला. ३ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांच्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करत त्यांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य उपस्थितांसाठीही समाधानाचा क्षण ठरला.

ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात क्षयरोगाचा सामना करणाऱ्या गरजू बालरुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यात आल्या. त्यानुसार सायकल, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट वॉच, क्रिकेट किट यांसारख्या वस्तू त्यांना भेट म्हणून देण्यात आल्या. कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेविका सहर शेख, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे आदी उपस्थित होते.

छोट्या इच्छांचा मोठा आधार 
क्षयरोग हा केवळ शारीरिक आजार नसून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मानसिक, सामाजिक तसेच आर्थिक आव्हान निर्माण करणारा आजार आहे. अशा परिस्थितीत औषधोपचारांसोबतच प्रेम, आपुलकी आणि प्रोत्साहनाचीही गरज असते. बालरुग्णांच्या छोट्या इच्छा पूर्ण करून त्यांच्यामध्ये नव्या आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याचे ‘मेक अ विश फाउंडेशन’च्या स्मिता पाटील यांनी सांगितले.

महापौरांकडून कौतुक 
मुलांच्या गरजा समजून घेत त्यांना शिक्षण आणि दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद पाटील तसेच ‘मेक अ विश फाउंडेशन’च्या स्मिता पाटील यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT