मुंबई

प्राचीन शिवमंदिरावरून संघर्षाची ठिणगी

CD

उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : उल्हासनगर आणि अंबरनाथच्या सीमेवर असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या सन्मानासाठी रणशिंग फुंकणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाने प्रशासनाला दखल घ्यायला भाग पाडले आहे. शिवमंदिरासमोरील कब्रस्तान आरक्षणाच्या मागणीविरोधात उभारलेल्या हिंदू जनआक्रोशानंतर उपोषणकर्त्यांनी माघार घेतल्याने प्रस्तावित धरणे आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मंदिराच्या संरक्षणासाठीचा संघर्ष आणि जनजागृतीची मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा या वेळी संघटनांनी दिला आहे.
प्राचीन शिवमंदिरासमोरील जागेवर कब्रस्तानसाठी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काही मुस्लिम बांधवांनी उल्हासनगर महापालिका परिसरात उपोषण सुरू केले होते. ही मागणी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी असून, सामाजिक सलोखा बिघडविणारी असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने २३ जूनला महापालिकेसमोर धरणे आंदोलनाची घोषणा केली होती. आंदोलनाच्या हाकेनंतर शहरातील हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकवटू लागल्याचे पाहून पालिका आणि पोलिस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप केला. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने प्रस्तावित धरणे आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, शिवमंदिराच्या सन्मानासाठी सुरू केलेली जनजागृती मोहीम कायम राहणार असून राज्य सरकारने हिंदूंच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचा आदर राखून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे. अन्यथा भविष्यात हे आंदोलन थेट राज्य सरकारविरोधात उभे राहील, असा इशारा जिल्हा संयोजक अमित भोईर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT