मुंबई

तुर्भे ग्रामस्थांची ऐतिहासिक एकजूट

CD

तुर्भे ग्रामस्थांची ऐतिहासिक एकजूट
गावठाण, सनदधारक मालमत्ता व स्मार्ट मीटर प्रश्नावर निर्णायक लढ्याची घोषणा
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई पालिका, सिडको आणि इतर यंत्रणांकडून गावठाण क्षेत्रातील तसेच सनदधारक मालमत्तांवर सुरू असलेल्या विविध कारवायांच्या पार्श्वभूमीवर तुर्भे गावातील ग्रामस्थांनी एकजुटीचे दर्शन घडवले आहे. रविवारी (ता. २१) तुर्भे येथील शांतामहिला मंडळ इमारतीमध्ये आयोजित केलेल्या विशेष जाहीर सभेत गावठाण हक्क, मालमत्ता कर आणि महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आरपारच्या लढ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या वेळी नगरसेवक रामचंद्र घरत, नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका कविता पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मालमत्तांवरील कारवायांविरोधात ठाम भूमिका मांडली असून, ग्रामस्थांनी याचा तीव्र निषेध नोंदवला. शासनाच्या विविध नोंदींमध्ये अस्तित्वात असलेल्या मालमत्तांना अतिक्रमणाच्या नावाखाली लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गावठाण क्षेत्रातील रहिवाशांचे पारंपरिक हक्क अबाधित ठेवण्याची मागणी या वेळी करण्यात आली. स्मार्ट मीटर सक्तीविरोधातही ग्रामस्थांनी एकमुखी भूमिका घेतली. नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न थांबवून ही सक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. यासोबतच नवी मुंबईतील सर्व गावांनी एकत्र येऊन सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT