मुंबई

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी पनवेल सज्ज

CD

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी पनवेल सज्ज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रथमच पोलिओ लसीकरण केंद्र; ५४ हजारांहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट
पनवेल, ता. २३ (बातमीदार ) : येत्या २८ जूनला होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून, यंदाच्या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात प्रथमच पोलिओ लसीकरणासाठी विशेष ट्रांझिट टीम तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील स्थलांतरित कुटुंबे आणि प्रवाशांच्या बालकांपर्यंतही लसीकरणाचा लाभ पोहोचविणे शक्य होणार आहे. ५४ हजारांहून अधिक बालकांना डोस देण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल उपविभागीय कार्यालयात तालुका टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा सागर पवार, नायब तहसीलदार संभाजी शेलार, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी संदीप भोईर यांच्यासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा पवार यांनी मोहिमेचा कृती आराखडा सादर करीत तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
या मोहिमेसाठी तालुक्यात विविध ठिकाणी २७७ लसीकरण बूथ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी ८ ट्रांझिट टीम कार्यरत राहतील. तसेच दुर्गम व स्थलांतरित वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी २१ फिरती पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

Mumbai: सायकल ट्रॅक, जिम, 60 हजार झाडं... मुंबईला ‘सेंट्रल पार्क’ची भेट मिळणार! लंडन-न्यूयॉर्कला टक्कर देणार; काय सुविधा असणार?

World Olympic Day 2026: २३ जूनलाच का साजरा केला जातो ऑलिम्पिक दिन; यंदाची थीम काय ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व !

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT