मुंबई

पनवेलमधील रिसॉर्ट, फार्महाऊस आणि लॉजिंग व्यवसायांवर प्रशासनाची करडी नजर

CD

पनवेलमधील पर्यटन व्यवसायांवर प्रशासनाची करडी नजर
नवीन नियमावली लागू; पाहुण्यांची संपूर्ण नोंद, सीसीटीव्ही अनिवार्य
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : पनवेल तालुका आणि परिसरात वेगाने वाढणाऱ्या पर्यटन व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी होमस्टे, रिसॉर्ट, फार्महाउस, लॉजेस आणि बेड अँड ब्रेकफास्ट सुविधांसाठी कडक नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामुळे पनवेल तालुक्यातील शेकडो पर्यटन आणि निवास व्यवसायांवर प्रशासनाची थेट करडी नजर असणार आहे.
पनवेल परिसरात कर्नाळा, आपटा, चिरनेर, वाजे, डेरवली, मोरबे परिसर तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट, फार्महाउस, लॉजिंग-बोर्डिंग आणि होमस्टे सुविधा कार्यरत आहेत. पर्यटन आणि वीकेंड डेस्टिनेशन म्हणून पनवेलची लोकप्रियता वाढत असताना अनेक पर्यटक वास्तव्यास येत असतात. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच समाजविघातक प्रवृत्ती आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी किशन जावळे यांनी नवीन नियम लागू केले आहेत.

नवीन नियमावलीत या आहेत तरतुदी
१ कोणत्याही पर्यटकाला निवास देताना त्याची संपूर्ण माहिती, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, कायमस्वरूपी पत्ता, वाहन क्रमांक आणि आगमन व प्रस्थानाची वेळ नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. ही माहिती गेस्ट रजिस्टर किंवा डिजिटल स्वरूपात किमान दोन वर्षे जतन करावी लागणार आहे.
२ सर्व रिसॉर्ट, फार्महाउस आणि लॉजिंग आस्थापनांमध्ये प्रवेशद्वार, पार्किंग, रिसेप्शन, कॉरिडॉर आणि स्विमिंग पूल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. किमान ३० दिवसांचे फुटेज जतन करून ठेवावे लागणार असून, पोलिस तपासणीसाठी ते उपलब्ध करून द्यावे लागेल.
३ अनेक फार्महाउस आणि रिसॉर्टमध्ये वाढदिवस, कॉर्पोरेट कार्यक्रम, खासगी पार्ट्या आणि विविध समारंभासाठी संबंधित पोलिस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार असून, ध्वनिक्षेपक नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्री-वेडीग शूट, इंडोनेशिया ट्रीप, पासपोर्टची चोरी अन् लोहगड ट्रेक; सियाने केतनच्या हत्येसाठी रचला होता भयंकर कट

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Male Fertility Warning: पुरुषांनो सावधान! ताण, अपुरी झोप आणि 'या' सवयींमुळे होऊ शकतो तुमच्या fertility वर परिणाम

SCROLL FOR NEXT