मुंबई

कोपरखैरणे, दिघ्यातील माता-बाल रुग्णालये बांधकामाच्या चुकीमुळे रखडली

CD

चुकीच्या बांधकामामुळे माता-बाल रुग्णालये रखडली
महापालिकेवर नव्याने काम करण्याची नामुष्की
तुर्भे, ता. ७ (बातमीदार) ः कोपरखैरणे आणि दिघा परिसरातील नागरिकांसाठी उभारलेल्या स्वतंत्र माता-बाल रुग्णालयांच्या इमारती पूर्ण होऊनही अद्याप वैद्यकीय सेवा सुरू झालेली नाही. या रुग्णालयांत गरजेनुसार व वैद्यकीय मानकांनुसार अंतर्गत बांधकाम केले नसल्याचे समोर आल्याने आता या इमारतींमधील काही बांधकाम तोडून नव्याने काम करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या इमारती वापराविना धूळखात पडून असून, या प्रकाराला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
कोपरखैरणे आणि दिघा येथे उभारण्यात आलेली माता-बाल रुग्णालये सुरू झाल्यास या भागातील महिलांना आणि बालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. कोपरखैरणे येथे महापालिकेचे सुरुवातीपासून स्वतंत्र माता-बाल रुग्णालय होते. मात्र, त्याची इमारत जीर्ण झाल्याने ही इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत उभारली आहे. १० वर्षांनंतर ही इमारत उभारून तयार आहे. मात्र, रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत रचना आणि आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने काम झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तयार इमारतीत रुग्णालय सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, आवश्यक बदल करण्यासाठी काही अंतर्गत बांधकाम पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्याची प्रक्रिया महापालिकेला हाती घ्यावी लागत आहे.
कोपरखैरणे भागात असलेले माता-बाल रुग्णालय बंद झाल्याने येथील गरोदर महिलांना उपचारासाठी वाशी रुग्णालय गाठावे लागत असल्याने वेळ आणि पैशाचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे ही रुग्णालये लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्याचप्रमाणे दिघा येथील झोपडपट्टी भागातील गरोदर महिलांसाठी रुग्णालय सुरू झाल्यास येथील महिलांना त्याचा अधिक फायदा होणार आहे.

जबाबदारी निश्चित होणार का?
एकीकडे माता-बाल रुग्णालयांची गरज असताना दुसरीकडे कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या इमारती वापराविना पडून आहेत. चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणाऱ्या संबंधित यंत्रणा, अधिकारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार का तसेच त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेल्या प्रकल्पात अशा प्रकारे नियोजनाचा अभाव राहिल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड पुन्हा महापालिकेलाच सोसावा लागणार आहे.

रुग्णालयातील दरवाजे इतके अरुंद आहेत की आतमध्ये बेड लावता येणे शक्य होत नाही. ऑपरेशन थिएटरची रचनाही चुकीची झाली आहे. वैद्यकीय मानकानुसार रुग्णालयात सोयीसुविधा उभारणे गरजेचे आहे. मात्र त्याप्रमाणे बांधकाम झाले नाही, असे आमच्या पाहणीत आले आहे. प्रशासकीय काळात बांधकाम झाल्याने या कामांवर प्रशासनाचा अंकुश नव्हता. त्यामुळे पुन्हा नव्याने आतील रचना बदलून रुग्णालयाच्या दृष्टीने बांधकाम करावे लागणार आहे. ते झाल्यावरच ही दोन्ही रुग्णालये कार्यान्वित करता येणार आहेत. त्या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
- डॉ. जयाजी नाथ, आरोग्य समिती सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT