मुंबई

अमली पदार्थांविरोधात ‘जेन अल्फा’चा आवाज

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी आता थेट तरुणाईचीच ‘फौज’ मैदानात उतरवली आहे. १७१ शाळांमधील तब्बल २८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘ड्रग्जला नकार, जीवनाला होकार’चा नारा देत व्यसनाविरोधात आवाज बुलंद केला. पोलिसांचे भाषण ऐकण्यापुरते हे अभियान मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल, कॅमेरा आणि त्यांच्या कल्पनाशक्तीलाच जनजागृतीचे हत्यार बनविण्यात आले आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे, विजू माने, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

परिमंडळ-१च्या पुढाकाराने नौपाडा, ठाणेनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा आणि शीळ-डायघर परिसरातील शाळांना या अभियानाशी जोडण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले. ‘नशामुक्त भारत, नशामुक्त ठाणे’ हे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ, कला आणि कौशल्याच्या दिशेने जाण्याचा संदेश देण्यात आला. ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त अशोक दुधे, उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आता ‘रील’मध्ये दिसणार ड्रग्जविरोधी लढा!
११ ऑक्टोबरपर्यंत अभियानाचा पुढचा टप्पा रंगणार आहे. लघु (रील) व्हिडिओ, पोस्टर, डिजिटल पोस्टर, मुक्त व्यासपीठ, कविता, अभिवाचन, पथनाट्य आणि लघुनाटिका अशा स्पर्धांमधून विद्यार्थी व्यसनाविरोधी संदेश स्वतःच्या शैलीत मांडणार आहेत.

‘युवकांकडून युवकांसाठी’ संदेश
या मोहिमेचा सर्वात वेगळा भाग म्हणजे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देणे. उत्कृष्ट रील, पोस्टर आणि सादरीकरणे सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केली जाणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘अमली पदार्थांना नकार द्या; जीवनाला स्वीकारा!’ हा संदेश घेऊन या अभियानात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT