मुंबई

बल्क ड्रग पार्कविरोधात शेतकरी आक्रमक

CD

बल्क ड्रग पार्कविरोधात शेतकरी आक्रमक
कडापे येथे उद्या महासंग्राम आंदोलन
माणगाव, ता. १५ (वार्ताहर) : तालुक्यातील २१ गावांच्या जमिनी संपादनावेळी दिलेली आश्वासने मोडून या भागात प्रस्तावित केलेल्या रासायनिक बल्क ड्रग पार्कविरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाच्या निषेधार्थ उद्या (ता. १६) सकाळी ११ वाजता कडापे येथील मंदिर परिसरात महासंग्राम आंदोलनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती बल्क ड्रग पार्कविरोधी समितीने शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत दिली.
समितीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी बल्क ड्रग पार्कला तीव्र विरोध दर्शविला असून, ते म्हणाले, की माणगाव तालुक्यातील २१ गावांच्या जमिनी एमआयडीसीने संपादित केल्यानंतर त्या ठिकाणी इंजिनिअरिंग व ऑटोमोबाईल उद्योग येतील, रासायनिक कारखाने येणार नाहीत, अशी आश्वासने अनेकदा खासदार व आमदारांकडून दिली होती. मात्र, सध्या या परिसरात प्रस्तावित बल्क ड्रग पार्कमुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. रासायनिक उद्योगांमुळे परिसरातील नद्या, शेती, भूजलसाठे, पिण्याचे पाणी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
स्थानिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी तडजोड करून कोणताही प्रकल्प लादला जाऊ नये, अशी भूमिका समितीने मांडली. तसेच या प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घेऊन जनतेच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणी समितीने केली आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेला सभापती विलास शिंदे, राजाभाऊ रणपिसे, दीपकशेठ जाधव, विपुल उभारे, मिलिंद खानविलकर, सयाजी मोरे, संजोग मानकर, सुधीर पवार, लहू पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनात १५ ते २० हजार नागरिक सहभागी होणार
बल्क ड्रग पार्कविरोधात बुधवारी सकाळी ११ वाजता कडापे येथील मंदिर परिसरात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या आंदोलनात माणगाव तालुक्यासह परिसरातील सुमारे १५ ते २० हजार शेतकरी व नागरिक सहभागी होतील, असा दावा समितीने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून बल्क ड्रग पार्कबाबत स्थानिक जनतेची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे १६ सप्टेंबरचे आंदोलन माणगाव तालुक्यातील आगामी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
बल्क ड्रग पार्कच्या प्रस्तावामुळे औद्योगिक विकासाच्या अपेक्षा व्यक्त होत असताना दुसरीकडे पर्यावरण, शेती, पाणी आणि आरोग्याच्या मुद्द्यांवरून स्थानिकांकडून विरोध वाढत आहे. त्यामुळे सरकार या प्रकल्पाबाबत कोणती भूमिका घेणार, स्थानिकांच्या आक्षेपांची दखल घेतली जाणार का आणि लोकप्रतिनिधी जनतेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका स्पष्ट करणार, याकडे आता माणगाव तालुक्यासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

फोटो ओळ - पत्रकार परिषदेत आंदोलनासदर्भात माहिती देताना समितीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, सभापती विलास शिंदे, दीपकशेठ जाधव, राजाभाऊ रणपिसे, विपुल उभारे व इतर मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT