मुंबई

वाशी नाका परिसरात अवैध पार्किंगचा विळखा

CD

वाशी नाका परिसरात अवैध पार्किंगचा विळखा
नागरिक, वाहनचालक त्रस्त; वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १६ ः चेंबूर येथील आर. सी. मार्गावरील वाशी नाका परिसरातील मार्गाच्या दुतर्फा अवैधरीत्या अवजड वाहने उभी केली जात असल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
चेंबूरच्या माहुल गाव, गडकरी खाण आणि वाशी नाका परिसरात बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा पॉवर, एजिस आणि आरसीएफ यांसह अनेक औद्योगिक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ये-जा करणारे मालवाहू ट्रक, एलपीजी सिलिंडर वाहून नेणारे ट्रक, टँकर आणि अन्य अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात उभी केली जातात. त्यामुळे वाशी नाका, माहुल गाव, आणिक गाव आणि शंकर देऊळ परिसरातील मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
या वाहतूक कोंडीचा फटका चेंबूर रेल्वे स्थानक तसेच सायन-पनवेल मार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी असल्याने उपलब्ध रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहनांना मार्ग काढताना अडचणी येतात. पादचाऱ्यांनाही दोन वाहनांच्या मधून जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, या परिसरात औद्योगिक प्रकल्पांमुळे रासायनिक वायू आणि प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. त्यातच रस्त्यांवरील अवैध पार्किंगमुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. काही वर्षांपूर्वी गव्हाणपाडा परिसरातील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी नेत असताना वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अवैध पार्किंग हटवून कारवाई करावी. तसेच औद्योगिक प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अवजड व रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग अथवा प्रतीक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित विभागांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी अन्यथा नागरिकांच्या हितासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल.
- ॲड. संतोष धोत्रे, आरटीआय कार्यकर्ते

वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो. प्रशासनाने तातडीने ही वाहने हटवून कायमस्वरूपी पार्किंगची व्यवस्था करावी.
- गौतम मोरे, स्थानिक नागरिक

गव्हाणपाडा परिसरातील अनधिकृत पार्किंगचा विषय प्रशासन आणि प्रभाग समितीकडे मांडण्यात आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- अंजली नाईक, नगरसेविका, शिवसेना (शिंदे गट)

वाशी नाका परिसरातील अनधिकृत पार्किंगबाबत वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.
- लक्ष्मण उकिर्डे, पोलिस निरीक्षक, ट्रॉम्बे वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : मुंबईतील 'फिल्म सिटी'मधील प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT