मुंबई

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना निवडणूक आयोगाचे काम पूर्ण करावे लागणार

CD

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना
निवडणूक आयोगाचे काम पूर्ण करावे लागणार
मुंबई, ता. १६ : जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. उपलब्ध रिक्त पदांचा आढावा घेऊन ऑनलाइन पोर्टलद्वारे बदलीसाठी अर्ज मागविण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. दरम्यान, बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना तसेच मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भातील संचालक (जनगणना) आणि निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे.
ग्रामविकास विभागाच्या १० सप्टेंबरला इतिवृत्तातून ही बाब समोर आली आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त बिंदूंचा आढावा घेऊन संबंधित पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवावेत. अर्ज सादर करण्याची विहित मुदत संपल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बदली झालेल्या शिक्षकांच्या आदेशामध्ये जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित संचालक तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन करण्याची अट नमूद करण्याचेही निर्देश आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीनंतरही शिक्षकांना या शासकीय कामांत सहभागी व्हावे लागणार आहे.
ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुलैला झालेल्या बैठकीत उपलब्ध रिक्त पदांचा आढावा घेऊन ऑनलाइन पोर्टलद्वारे बदलीसाठी अर्ज मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यातील शाळांमध्ये नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
दरम्यान, जनगणना आणि एसआयआरच्या अतिरिक्त कामामुळे शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शिक्षक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. मुंबईत शिक्षकांकडून एसआयआरचे काम करून घेतले जात असल्याने महापालिकेला जुलै महिन्यात काही शाळांच्या वेळांमध्ये बदल करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT